ऊन पाखरू चालत रान वनात पडत
सावलीच्या शोधपाई दिसरात रडत
त्याचा तो आवाज काळजाला भिडत
धांगड धिंगा झाला ग मनात
धांगड धिंगा झाला ग उरात
पाहुनिया बोल ते ऊन पावस आठवी
सात रंगाची लहरी एका रंगात दाटवी
प्रत्येकाला तोंड द्यावं लागे असा ऊन पावसाचा खेळ ह्यो
रक्ताचं नसलं तरी बांधून ठेवी असा सुख दुःखाचा मेळ ह्यो
अश्या गाईचा हंबरडा कानाव पडत
धांगड धिंगा झाला ग मनात
धांगड धिंगा झाला ग उरात