माणसा वरची श्रद्धा कमी झाली म्हणून की काय त्या ने देव तैयार केला आणि आज तोच देवाच अस्तित्व शोधु लागला आहेदेवाला सुद्धा स्वताच्या असण्याचा राग आला असावा नाहीतर एकच असूनही अनेक रूप घेण्याच् कारण काय.
अनेक दार्शनिक असे सांगतात की या जीवसृष्टि च्या मागे एक शक्ति अविरत चालत असते. ती तिच नित्य काम करत राहते.त्यालाच आपण नियती असे म्हणतो.
अनेकांनी याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. बुद्ध पासून ते अगदी योगी सिगमन फ्रुओइड पर्यंतसगळ्यांना याची कल्पना होती की धर्म हा भ्रम आहे पण समुहात रहाणे कधीही चांगले व याच गोष्टि साठी धर्माची आवश्कयता आहे.
मग हीच गोष्ठ एकमेकांत अडणीची वाटली आणि आपल्या समुहाचीच सत्ता असावी असे वाटू लागले आणि धर्मयुद्ध सुरु झाले ते अजुनपर्यंत आहे.माणसा माणसा मधील वाढणारा हा भेद हा इतका कोपाला जावा हे कधीच वाटले नव्हते.
आमचच धर्म श्रेष्ठ आणि बाकीचे अधर्मी असे म्हंनारे बरेच तैयार झाले.जगा आणि जगु दया इतका सोपा धर्म सुद्धा ज्यांना पचत नाही त्यांनी धर्माची गोष्ठ करुच् नये.काही जपायचच असेल तर माणसा माणसा मधली नाती जपा आणि तोडायचच असेल तर आपआपसतले कटु संबंध तोडा आणि मोठ्या मनाने एकमेकांना भेटा…
अनेकदा विचार येतो की इतके धर्म स्थापन झाले व काही समुदाय नष्ठ ही झाले पण देवाला प्राप्त करणे सर्वानी पसंत केले. सर्व दार्शनिक म्हणाले,” मोक्षप्राप्ती करा, जीवनाच सार्थक होईल” पण काही असेही म्हणाले जग्न्यताच खरा धर्म, आणि देव आहे. चीन मधील कनफ्यूसियस हा मला असाच वाटतो.
जगा आणि जगु दया. हाच खरा धर्म मानला पाहिजे.आणि कोणी कोणाचा धर्म स्विकारावा व स्विकारु नये हे ज्याचे त्याने धर्माचा पूर्ण विचार व निरिक्षण करुण तो धर्म स्विकारावा व तो धर्म आचरणात आणावा.
माणसावरची श्रद्धा
