मी प्रतिक होतो त्या अंधाराचा,
जिथे निराशा जगत होती,
आशेचे किरणे सुद्धा,
जिकडे यायला घाबरत होती,
ग्रह ताऱ्यांंचा खेेेळ निराळा,
अवघे ब्रह्मांड उलटे फिरत होते,
मी त्या रात्रीही जळत राहिलो,
जिकडे आग ही विझत होती.
छोटेसे विश्व माझे,
जाळून राख करत होतो,
इवल्याश्या बियात,
अंकुराची वाट पाहत होतो,
हुंदका आवरेना म्हणून,
निमूट गप पडून होतो,
इवल्याश्या अंकुरात
मी स्वप्न पेरत होतो,
भिजक्या अंधारात स्वप्ने उगवली होती,
बियाणांची ती जपमाळ मी अवचित तोडली होती,
पेरलेल्या स्वप्नांना अंकुरे फुटली होती,
फुटलेल्या अंकुराची राख झाली होती
मी प्रतिक होतो त्या अंधाराचा,
जिथे निराशा जगत होती,