जबाबदाऱ्यांचं ओझं आहे त्यात प्रॉब्लेम 1760…
आयुष्याला चकवा लागला आहे त्यात मिळत नाही वाट…
पैशांची कमी आहे त्यात जॉब सुटायची भीती आहे..
माझीच नाही रे ती सगळ्यांचीच परिस्थिती आहे.
पण ठीक आहे काही हरकत नाही पण कष्ट केल्याशिवाय बरकत नाही.
स्वप्न खूप मोठी आहेत रे पण सध्या झोप लागतं नाही
मेहनतीचं खातोय नशीब भीक मागत नाही..
आपले आपले म्हणणारे सोडून गेले ज्यांना हृदयात जागा दिली ते दिल तोडून गेले
सध्या टाइम खराब आहे रे पण आपण नडणार
लागेल थोडंफार पण आपण लढणार फक्त लढणारच नाहीतर जिंकणारसुद्धा…
एक मोठी गाडी घ्यायची आहे रे आणि आईसाठी घर…
गळणारे पत्रे नको आता सुदंर सिलिंक हवंय वर…
एक दिन ये बुरा वक्त भी बीत जायेगा और ये हारा हुवा इंसान भी एकदिन जित जायेगा..